मंगल कार्यालयातून चोरट्याने केली चेन लंपास

। लोकजागर । फलटण । दि. 0८ फेब्रुवारी २०२५ ।

लग्नसमारंभात चोरीची आणखीन एक घटना पुढे आली असून अज्ञात चोरट्याने सोन्याची चेन व पर्स लंपास केल्याचा प्रकार फलटण शहरात घडला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फलटण शहरानजिक असलेल्या कोळकी येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालयात दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १२:३० च्या दरम्यान सदरची घटना घडली असल्याची फिर्याद समीर भानुदास नाळे, रा. दुधेबावी, ता. फलटण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अज्ञात चोरट्याने कपड्याच्या बॅगमध्ये ठेवलेली 1 लाख 22 हजार 900 रुपयांची सोन्याची चेन व १०० रुपये किंमतीची पर्स लंपास केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सदर चोरीप्रकरणी पुढील तपास फलटण शहर पोलीसांकडून सुरु आहे.

Spread the love