संगित खुर्ची स्पर्धेचे आयोजन; विजेत्या महिलांना पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्याहस्ते बक्षीस वितरण
। लोकजागर । फलटण । दि. ०९ फेब्रुवारी २०२५ ।
प्रजापिता ब्रह्माकुमारी फलटण सेंटर यांच्यावतीने दिनांक 3 व 4 रोजी फलटण शहरातील पवार गल्ली, व कोळकी येथील हळदी कुंकूवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हळदी कुंकवासाठी उपस्थित असलेल्या महिलांना देण्यात आलेले धार्मिक व ज्ञानवर्धक पुस्तकांचे वाण कार्यक्रमाचे आगळे – वेगळे वैशिष्ठ्य ठरले.
दरम्यान, हळदी कुंकवाच्या निमित्ताने संगीत खुर्चीची स्पर्धा खेळविण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या सहा महिलांना रोख बक्षीसाचे वितरण फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक मुळीक, माधुरी शिंदे, अटक मॅडम, अनिता बागल, मोहिनी यादव, सोनाली गवळी यांची उपस्थिती होती.
‘‘ब्रह्माकुमारी ईश्वरी विद्यालयाच्या माध्यमातून मूल्यनिष्ठ समाज निर्मितीचे काम होत आहे आणि राजयोगाच्या माध्यमातून हजारो व्यक्तींना अवगुणमुक्त, व्यसनमुक्त, विकार मुक्त झाल्याचे आपणास पहावयास मिळते आहे. अनेकांना पारिवारिक शांती, सामाजिक शांती आणि वैश्विक शांतीचा लाभ या सेंटरच्या माध्यमातून होत आहे. अनेकांच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होत आहेत. बायपास सर्जरी करण्यासाठी सांगण्यात आलेल्या हृदय रोग्यांना मेडिटेशनच्या माध्यमातून बरे करण्यात आले आहे. जनतेने या गोष्टीचा लाभ घ्यावा’’, असे आवाहन यावेळी प्रजापिता ब्रम्हाकुमारी फलटण सेंटरच्यावतीने करण्यात आले.