डॉ.विश्वनाथ चव्हाण, वाठार हेल्थ स्टेशन आणि महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी क्लिनीक यांचा संयुक्त उपक्रम
। लोकजागर । फलटण । दि. १४ मार्च २०२५ ।
डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण, वाठार हेल्थ स्टेशन आणि महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ : ३० या वेळेत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, संयोजकांकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या शिबीरात काही तपासण्या मोफत तर काही तपासण्या विशेष सवलतीत होणार असून रुग्णांना तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ चव्हाण, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. स्मिता जाधव व त्वचारोग तज्ज्ञ डॉ. आण्णासाहेब कदम हे तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत.

सदर शिबीरात साखर तपासणी, रक्तदाब तपासणी, फुफ्फुस कार्य तपासणी, ईसीजी, स्त्री रोग सल्ला व समुपदेशन, त्वचारोग सल्ला व समुपदेशन या तपासण्या मोफत होणार आहेत.
तर विशेष सवलतीच्या दरात गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी, पुरुष आणि महिला वंध्यत्व उपचार विशेष सल्ला, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पूर्व तपासणी, डिलीव्हरी आणि दुर्बिणीतील शस्त्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
या शिबीरामध्ये वाठार स्टेशन, दहिगाव, पिंपोडे बुद्रुक, देऊर, तडवळे, नलवडेवाडी, विखळे, बिचकुले, तळिये ही गावे सहभागी करुन घेण्यात आली असून शिबीराच्या मोफत नोंदणीसाठी सौ. शितल पवार 8088539394, महेश गांधी 9730085685, अभिजीत निकम 8652396336 यांना संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.