। लोकजागर । फलटण । दि. १४ फेब्रुवारी २०२५।
राज्य परिवहन विभागाकडून फलटण आगारास प्राप्त झालेल्या १० नवीन अत्याधुनिक एस.टी. बसेसचे उद्घाटन व लोकार्पण आज दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ : ३० वाजता माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांनी परिवहन विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे फलटण आगारास मिळालेल्या या १० नवीन गाड्यांमध्ये प्रवाशांना प्रामुख्याने सिट पुश बॅक सुविधा, मोबाईल चार्जिंग सुविधा देण्यात आली असून या नवीन गाड्यांमुळे फलटण आगारातील एस.टी. कर्मचार्यांसह प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

या लोकार्पण कार्यक्रमानंतर फलटण आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे यांच्या व्यवस्थानत या नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत.