। लोकजागर । फलटण । दि. २५ फेब्रुवारी २०२५।
दि. २३ फेब्रुवारी रोजी सातारा येथे जिल्हास्तरीय मिनी सब ज्युनिअर व १० वर्षाखालील धनुर्विद्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये १८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत दिशा धनुर्विद्या ट्रेनिंग सेंटर फलटणच्या खेळाडूंनी यश संपादन केले असून या ट्रेनिंग सेंटरचा प्रशिक्षणार्थी, इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेला देवाशिष अशोक भिसे याची २८ फेब्रुवारी ते ०२ मार्च दरम्यान डेरवण, रत्नागिरी येथे होणार्या राज्यस्तरीय मिनी सब जुनियर धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
देवाशिष यास शेखर देवकर, निखिल सर, सुरज ढेंबरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

सदर यशाबद्दल देवाशिष याचा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.