‘गॅलेक्सी’ पतसंस्था येत्या काळात भरभराटीला येईल : आयुक्त शेखर सिंह

पिंपरी – चिंचवड येथे ‘गॅलेक्सी’ पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन करताना आयुक्त शेखर सिंह. सोबत सचिन यादव, सौ. सुजाता यादव.

गॅलेक्सी को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पुणे जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे पिंपरी – चिंचवड येथे उद्घाटन

। लोकजागर । फलटण । दि. २ मार्च २०२५ ।

‘‘गॅलेक्सी पतसंस्थेा येणार्‍या काळात भरभराटीला येऊन तिच्या पुणे जिल्ह्यात जास्तीत जास्त शाखा सुरु होतील’’, असा विश्‍वास पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

फलटणच्या गॅलेक्सी को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि; च्या पुणे जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन पिंपरी – चिंचवड येथे शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘गॅलेक्सी’ संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा उद्योजक सचिन यादव, संचालिका सौ. सुजाता यादव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

संस्थेचे व ग्राहकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न : सचिन यादव

‘‘संस्थेच्या स्थापनेपासूनच अतिशय पारदर्शक आणि ग्राहकांना प्रभावी सेवा देवून संस्थेने ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे. सभासद, ग्राहक व हितचिंतक यांच्या अडचणींचे काळात आर्थिक सहाय्य देवून ग्राहकांच्या मनात संस्थेबद्दल एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशीच अविरत सेवा देवून भविष्यात संस्थेचे व ग्राहकांचे जीवनमान उंचावणार आहे’’, असे सांगून ‘‘संस्थेस प्राप्त झालेला ‘अ’ वर्ग सन्मान म्हणजे संस्थेच्या प्रामाणिकपणाची आणि पारदर्शक कारभाराची पोहच पावती आहे’’, असे सचिन यादव यांनी यावेळी नमूद केले.

‘‘गॅलेक्सी’ पतसंस्थेने सातारा जिल्ह्यात विश्‍वासाचा एक भक्कम पाया तयार केला असून आपल्या सदस्यांना यशस्वीरित्या आर्थिक सेवा प्रदान केल्या आहेत. संस्थेची ही यशस्वी घोडदौड पुणे जिल्ह्यातही अशीच सुरु राहील’’, असा विश्‍वास यावेळी संस्थेचे कर्मचारी, ग्राहक व सभासदांनी व्यक्त केला.

Spread the love