कृषि विभागाचा उपक्रम
। लोकजागर । फलटण । दि. ०८ मार्च २०२५ ।
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सातारा अंतर्गत तालुका कृषि अधिकारी, फलटण यांच्यावतीने मंगळवार, दिनांक ११ मार्च २०२५ रोजी ड्रॅगन फ्रुट, आंबा व्यवस्थशपन व फळ प्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दिवशी सकाळी ९ वाजता फळांचे गाव ‘धुमाळवाडी’ येथील द्राक्षे फार्म, निकम वस्ती येथे ही कार्यशाळा संपन्न होणार आहे.

सदर कार्यशाळेस सातारा जिल्हा कृषि अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे, आत्मा साताराचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, फलटर उपविभागीय कृषी अधिकारी खालीद मोमीन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर या कार्यशाळेत पोलन अॅग्रो मिनरल्स प्रा. लि; कोल्हापूरचे तज्ज्ञ संचालक डॉ. सागर कोपर्डेकर, राष्ट्रीय अजैविक तण व्यवस्थापन संस्था माळेगाव बु॥, ता. बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. विजय काकडे, डॉ. गोरख वाघचौरे व डॉ. ए. एम. बोरैया यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे.
तरी या कार्यशाळेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन फलटण तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्याकडून करण्यात आले आहे.