मुधोजी क्लब मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याचे आज लाईव्ह प्रक्षेपण
। लोकजागर । फलटण । दि. ०९ मार्च २०२५ ।
येथील गोविंद मिल्क, मुधोजी क्लब व राजे ग्रुप, फलटण यांच्यावतीने फलटणकर क्रिकेट रसिकांना आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना बिग स्क्रीनवर पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आय.सी.सी. चँपीयन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आज दुबई येथे भारतीय संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. क्रिकेट रसिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार असून यानिमित्ताने दुपारी 2 वाजल्यापासून 30 बाय 16 च्या मोठ्या स्क्रीनवर शहरातील मुधोजी क्लबच्या मैदानावर या संपूर्ण सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.
तरी हा क्रिकेट सामना मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा आनंद क्रिकेटप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.