प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी स्वीकारला फलटणचा पदभार

। लोकजागर । फलटण । दि. ११ मार्च २०२५ ।

फलटण उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी पदावर नियुक्त झालेल्या सौ. प्रियांका आंबेकर यांनी फलटण उपविभागाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी फलटण उपविभागीय अधिकारी, फलटण तहसील कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी सचिन ढोले यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर फलटणचा कार्यभार हा पर्यवेक्षित उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेला होता. त्यानंतर नियमित उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे असणाऱ्या सौ. प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

प्रारंभी सौ. प्रियांका आंबेकर यांचे शासकीय विश्रामगृह फलटण येथे निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांनी स्वागत केले. यावेळी फलटण प्रांत कार्यालय नायब तसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार महसूल तुषार गुंजवटे, फलटण तालुका तलाठी संघटना अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, मंडल अधिकारी शिलवंत चव्हाण हे उपस्थित होते.

Spread the love