दुधेबावीत प्रा. डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या स्मृतीदिनी मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न
। लोकजागर । फलटण । दि. १५ मार्च २०२५ ।
कुलदैवत खंडोबाचे संशोधन करून नव्या पिढीसमोर एक संशोधक दृष्टी निर्माण करणारे साहित्यिक म्हणून डॉ. विठ्ठल ठोंबरे यांची ख्याती होती. लोकसाहित्याच्या चळवळीतील अस्सल कोहिनूर हिरा खंडोबाने झपाटलेला विठोबा हा खरा मराठी साहित्याचा अलंकार आहे, असे प्रतिपादन डॉ. मुरहरी केळे यांनी केले.

डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त दुधेबावी (ता.फलटण) येथे आयोजित ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष म्डणून डॉ. केळे बोलत होते. यावेळी संमेलन स्वागताध्यक्ष प्रा. रवींद्र कोकरे, संमेलन उद्घाटक बा. ग. केसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संमेलन स्वागताध्यक्ष प्रा. रवींद्र कोकरे यांनी लोकसाहित्य हाच खरा साहित्याचा आत्मा असून दरवर्षी उपेक्षीत वंचित पण लोककलेची सेवा करणार्या लोककलावंताचा सन्मान करणे हा संमेलनाचा उद्देश आहे, असे नमूद केले.
संमेेलन उद्घाटक बा. ग. केसकर यांनी भटक्या विमुक्त समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन साहित्य सेवा करावी असे सांगितले.
यावेळी येथील वृक्षमित्र सचिन सोनवलकर यांना वनश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ह. भ. प. नवनाथ महाराज कोलवडकर (दालवडी) यांचे फुलाचे कीर्तन सकाळी दहा ते बारा या वेळेत झाले.
संमेलनाच्या दुपारच्या सत्रामध्ये हनुमंत चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन संपन्न झाले. यामध्ये विक्रम गायकवाड, प्रमोद जगताप, प्रा. मुकुंद वलेकर, अविनाश चव्हाण, प्रकाश सकुंडे, युवराज खलाटे, शुभांगी सोनवलकर, आशाताई दळवी, मनीषा मिसाळ, राहुल निकम, महोसीन आतार, ज. तु. गार्डे, बाबा लोंढे, सागर कराडे, आकाश आढाव, प्रतीक्षा आढाव, विद्या शेळके आदी कवी सहभागी झाले होते.
त्यानंतर ‘लोकसाहित्याचे योगदान’ या विषयावर प्रवीण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद संपन्न झाला. यामध्ये एम. डी. दडस, आम्रपाली कोकरे, प्रा. राजेंद्र आगवणे, गोपाळ सरक या साहित्यिकांनी आपली मते मांडली.
या ग्रामीण साहित्य संमेलनास मारुतराव वाघमोडे, राजेंद्र बरकडे, दिनकरराव सोनवलकर, शंकर शिंगाडे, कुमार देवकाते, जयवंत तांबे, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, अनिल कोकरे, सुभाष बोंद्रे, आकाश मुंडे, दिलीप कोकरे, सोमनाथ लोखंडे, पिंटू ठोंबरे, बापूराव झंजे, विकास सोनवलकर, प्रकाश सस्ते, विठ्ठल पडर व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सोनवलकर व आभार प्रदर्शन सचिन लोखंडे यांनी केले.