। लोकजागर । गोखळी । दि. १६ मार्च २०२५ ।
गोखळी येथील नंदकुमार गजानन खटके (वय ५५) यांचे आकस्मित निधन झाले. सर्वांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ असणारे मनमिळाऊ स्वभावाचे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आकस्मित जाण्याने खटकेवस्ती, गोखळी पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखाना लि; फलटणचे संचालक संतोष गजानन खटके यांचे बंधू व आकाश नंदकुमार खटके (सर) यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात वडील, आई, चुलते, चुलती, एक विवाहित भाऊ, एक विवाहित बहिण, भावजय, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये फलटण, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, माळशिरस आणि परीसरातील सामाजिक, शैक्षणिक, सहकार, धार्मिक, राजकीय, वैद्यकीय आदी क्षेत्रांतील आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातेवाईक सहभागी झाले होते. गोखळी ता.फलटण येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
