। लोकजागर । फलटण । दि. १९ मार्च २०२५ ।
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) केंद्र, फलटण आणि प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्था यांचे संयुक्त विद्यमाने एकनाथ षष्ठी उत्सवानिमित्त सुश्राव्य नारदीय कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

उद्या, गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ : ०० वाजता येथील प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिरात आयोजित या कीर्तन सोहळ्यात निफाड (जि. नाशिक) येथील ह. भ. प. अनिल महाराज दातार (कोठुरेकर) हे आपली कीर्तनसेवा देणार आहेत.
या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्याकडून करण्यात आले आहे.