शेतकऱ्यांनी शेतीसारा भरण्याचे आवाहन

। लोकजागर । सातारा । दि. १९ मार्च २०२५ ।

सातारा तालुक्यातील सर्व शेतकरी, बिनशेती भूखंडधारक यांनी आपल्या शेतीचा, बिनशेती भूखंडाचा शेती सारा -दरवर्षी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे भरणे आवश्यक असते. तथापि सातारा तालुक्यातील बऱ्याच शेतकरी, भूखंड धारक यांनी अदयापी त्यांचा शेतसारा भरलेला नाही. तरी 25 मार्च २०२५ पूर्वी आपला शेतसारा, बिनशेती भूखंडाचा कर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे जमा करुन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केले आहे.

मुदतीत शेतसारा, बिनशेती कर जमा न केलेस संबंधित खातेदार यांचे 7/12 वरती थकित शेतसारा बिनशेती कर वसुल होणेवर ” असा बोजा चढविणेत येईल त्यामूळे संबंधितास बँक कर्ज, दस्त नोंदणी अशा अनेक अडचणीस सामना करावा लागेल, तथापि सदरची बाब टाळणेसाठी आपला शेतसारा, बिनशेती भूखंडाचा कर ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत भरणा करावा

Spread the love