युवक, युवतींना नोकरीची सुवर्णसंधी

मुधोजी महाविद्यालयात उद्या कॅम्पस इंटरव्ह्यू

। लोकजागर । फलटण । दि. २० मार्च २०२५ ।

फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी कॉलेज फलटण येथे शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ रोजी करिअर कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेल, आयसीआयसीआय बँक व अ‍ॅक्सिस बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बेरोजगार युवक – युवतींसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपबल्ध झाली आहे.

सरदहू बँकेमध्ये रिलेशनशिप मॅनेजर या ३१ पदासाठी सदर भरती करण्यात येत आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणार्‍या व पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या सर्व युवक व युवतींसाठी ही सुवर्णसंधी आहे. तरी शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ रोजी सकाळी दहा वाजता मुधोजी महाविद्यालयाच्या डी – 8 व डी -9 या हॉलमध्ये गरजूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

उमेदवारांनी येताना शैक्षणिक कागदपत्रांमध्ये दहावी, बारावीचे मार्कशीट, पदवी पूर्ण असल्यास त्याचे मार्कशीट, पदवीच्या तिसर्‍या वर्षी असलेल्या विद्यार्थ्यांनी दुसर्‍या वर्षीचे मार्कशीट, आधार कार्ड, एक आयडेंटी साईज फोटो, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक अँड्रॉइड मोबाइल सोबत आणणे आवश्यक आहे.

सदर नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी प्लेसमेंट ऑफीसर प्रा. प्रशांत शेट्ये यांना 9860303346 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Spread the love