श्री शिवप्रतिष्ठानचा उपक्रम
। लोकजागर । फलटण । दि. दि. २३ मार्च २०२५ ।
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान फलटण विभाग यांच्यावतीने आज ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.
फलटण शहरातील महाराजा मंगल कार्यालय येथे या पुस्तक प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन आज रविवार, दिनांक दि. २३ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत करण्यात आले आहे.

तरी इतिहास प्रेमी, अभ्यासक, वाचक, विद्यार्थी आदींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान फलटण विभाग यांच्यावतीने करण्यात आले आहे.