संभाव्य सरपंचपदाबाबत सोशल मिडीयाद्वारे सर्व्हे; राजे गटाच्या तानाजी कोलवडकर यांना लोकांची पसंती
। लोकजागर । फलटण । दि. २७ मार्च २०२५ ।
दालवडी (ता. फलटण) येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक आगामी काही दिवसांवर येवून ठेपली असून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गावात इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. या आगामी निवडणूकीच्या निमित्ताने एस.जे.टी.व्ही. या प्रसारमाध्यम वाहिनीकडून सोशल मिडीयाद्वारे सर्व्हे घेण्यात आला. या सर्व्हेमध्ये दालवडीच्या सरपंचपदासाठी राजे गटाचे तानाजी कोलवडकर यांना लोकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे पहायला मिळत आहे.

दालवडी गावात राजे गट प्रणित दोन गट व एक भाजप गट सक्रीय असून एस.जे.टी.व्ही.दालवडी ग्रामपंचायत इलेक्शन एक्झिट पोल या मथळ्याखाली सोशल मिडीयावर लोकांची पसंती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. २०५ लोकांनी याला प्रतिसाद दिला असून त्यामध्ये राजे गट तानाजी ज्ञानदेव कोलवडकर यांना ५२ %, भाजप महायुती गट 36 % तर राजे गट मधुकर आबु शिंदे यांना १२ % लोकांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
