। लोकजागर । फलटण । दि. ०७ एप्रिल २०२५ ।
शेतातील मातीचे परीक्षण पावसाळयापुर्वी करणे अत्यंत गरजेचे आहे. माती परीक्षण करण्यासाठी आपल्या जिल्हयामध्ये जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी कार्यालय हामदाबाज ता. सातारा येथे माती परीक्षण सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

सर्वसाधारण माती नमुना – यामध्ये सामु, विद्युतवाहकता, सेंद्रीय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश हे घटक तपासले जातात यासाठी तपासणी शुल्क नाममात्र रु.३५/- आहे. सुक्ष्म मुलद्रव्य माती नमुना- यामध्ये तांबे, लोह, मँगेनीज, झिंक हे घटक तपासले जातात यासाठी तपासणी शुल्क नाममात्र रु. २००/- आहे. तसेच फक्त शेतीसाठी पाणी नमुना तपासणी शुल्क नाममात्र रु.५०/- आहे. तरी शेतक-यांनी आपल्या शेताचा माती नमुना जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी कार्यालय हामदाबाज ता. सातारा येथे तपासनीसाठी आणावा. अधिक माहितीसाठी श्री. सुनिल यादव, कृषि पर्यवेक्षक मो.क्र.९४२३८७०९३४ यांचेशी संपर्क साधावा.
