। लोकजागर । फलटण । दि. ०९ एप्रिल २०२५ ।
नुसुचित जाती, जमाती व दुर्बल घटकातीलल व्यक्तीच्या सर्वांगिन विकासासाठी राज्य शासनाकडुन विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सर्वसामान्य जनतेला या योजनेची माहिती व्हावी तसेच जनजागृती व्हावी म्हणुन दरवर्षी राज्यशासनामार्फत सामाजिक सप्ताहाचे आयोजन केले जाते. यानुसार आज दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता नगर परिषद चौक, सातारा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान प्रास्ताविकेचे वाचन करुन दिनाकं ८ ते १४ एप्रिल या कालावधीत साजरा होणाऱ्या सामाजिक समता सप्ताहास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री सुनिल जाधव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद विद्यानंद चल्लावार सातारा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमांर्तगत समाजिक न्याय विभागाअर्तंगत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा प्रचार,प्रसार,स्वच्छता अभियान,रक्तदान शिबिर,ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा व विविध क्षेत्रभेटी देवुन लाभार्थ्यांशी संवाद साधणे तसेच महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजिक कार्याचे जीवन विचार जनसामान्यापर्यंत पोहचवणे आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वसतिगृहाचे गृहपाल,बार्टीचे प्रकल्प अधिकारी, समतादुत, वसतिगृहातील मुले व मुली उपस्थित होते.
