पुरस्कारासाठी २८ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे सातारा जिल्हा परिषदेमार्फत आवाहन

। लोकजागर । सातारा । दि. १० एप्रिल २०२५ ।

सातारा जिल्हा परिषदेमार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सातारा जिल्हयातील दलित, मागास स्त्रिया, उपेक्षित कष्टकरी वर्गाचे सामाजिक शैक्षणिक प्रबोधन करुन या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या जिल्हयातील एका संस्थेस दहा हजार रुपये व एका व्यकतीस सात हजार रुपये प्रोत्साहनात्मक पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी 28 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत.

संस्था व व्यक्ती यांनी सादर करावयाच्या नमुन्याच्या प्रती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. संस्था व व्यक्ती यांना पोलीस अधीक्षक यांचा चारित्र्य दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन) असणे गरजेचे आहे. संस्था व व्यक्ती यांनी आपले अर्ज दिनांक- २८ एप्रिल रोजीपर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सातारा यांच्या कार्यालयात पाठवावेत संस्था व व्यक्तीची निवड जिल्हा निवड समिती मार्फत छाननी नंतर करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर यांनी कळविले आहे.

Spread the love