सासकल येथील एकरी १०० टन ऊस पिक प्रात्यक्षिक प्लॉटला विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी यांची भेट
। लोकजागर । फलटण । दि. १४ एप्रिल २०२५ ।
कमी खर्चा मध्ये ऊस उत्पादन वाढ फुले सुपर केन नर्सरीद्वारे शक्य असल्याचे शेतकर्यांनी ऊस रोपे द्वारेच उसाची लागवड करावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी यांनी केले. सासकल (ता. फलटण) अजय कुलकर्णी यांनी १०० टन ऊस पिक प्रात्यक्षिक प्लॉटला प्रक्षेत्र भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी फलटण उपविभागीय कृषि अधिकारी खलीद मोमीन, फलटण तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड, विडणी मंडल कृषि अधिकारी शहाजी शिंदे, कृषि पर्यवेक्षक अजित सोनवलकर, कृषी सेवा रत्न कृषी सहाय्यक सचिन जाधव आदींसह सासकल पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, कृषि विभागामार्फत फुले सुपर केन नर्सरी पासून ऊस लागवड करण्यात आलेल्या मच्छिंद्र मुळीक या शेतकर्यांच्या क्षेत्रास प्रक्षेत्र भेट अजय कुलकर्णी यांनी दिली. त्यांनी ऊस रोपवाटिका द्वारे तयार करताना वापरलेलं तंत्रज्ञान तसेच बेणे प्रक्रिया, खत बेसल डोस वापर, 7 फूट 1.5 फूट अंतर वरती पट्टा पद्धतीद्वारे उसाची लागवड 0.40 गुंठे क्षेत्रात 4000 रोपाची लागवड केले आहे एका उसाला 8 ते 14 फुटवे आहेत एका उसाचे 2 किलो प्रमाणे वजन अपेक्षित ठेवल्यास एकरी 100 टन उत्पादन निघणार आहे आदी चर्चा यावेळी झाली.
कृषी विभागामार्फत सासकल गावात 18 सुपर केन नर्सरी द्वारे 90000 हजार रोपे तयार करून 22 एकर क्षेत्रावर वरती ऊस लागवड करण्यात आली आहे.
