कर्मवीरांचे विचार आचरणात आणून पुढे न्यावेत : डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके

। लोकजागर । फलटण । दि. १२ मे २०२५ ।

‘‘आजच्या पिढीने कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आचरणात आणून पुढे न्यावेत’’, अशी अपेक्षा श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके यांनी व्यक्त केली.

दिनांक 9 मे, 2025 रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण व सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज फलटण या चारही शाखांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 66 वा स्मृतिदिन संपन्न झाला. त्यावेळी डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके बोलत होते. प्रारंभी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, उपाध्यक्ष सी. एल. पवार व डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते स्व. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

यावेळी बापूसाहेब मोदी, प्रा. जी. बी. वाघ, प्रा. शेख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. एस. डी. यादव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. एन. राऊत यांनी केले तर आभार प्रा. सौ. एस. जी. धुमाळ यांनी मानले. कार्यक्रमासाठी चारही शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे प्रभारी प्राचार्य पी. डी. घनवट यांनी केले.

Spread the love