सौ. प्रीती संजय भोजने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित

। लोकजागर । फलटण । दि. १४ मे २०२५ ।

फलटण येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समिती, सुजन फाउंडेशन यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रयाग सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष व मानवाधिकार संरक्षण समिती फलटण तालुका अध्यक्ष सौ. प्रीती संजय भोजने यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सौ.प्रीती भोजने यांच्या सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व अध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2025 देऊन गौरव केला. सदरचा सन्मान लोकजागर प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्‍वस्त सौ. अलका बेडकिहाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव, ज्येष्ठ साहित्यिक ‘सर्ज्या’कार सुरेश शिंदे , पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बापूराव सूळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचचे अध्यक्ष तुकाराम कोकाटे, सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. प्रीती भोजने यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहेत..

Spread the love