के.बी.एक्सपोर्ट कंपनीला खा. शरद पवार यांची सदीच्छा भेट

। लोकजागर । फलटण । दि. २० मे २०२५ ।

शेतमाल निर्यात क्षेत्रात आघाडीवर असलेल्या फलटण तालुक्यातील के. बी. एक्सपोर्ट इंटरनॅशनल या कंपनीला देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी काल दि. १९ रोजी सदीच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत सौ. प्रतिभाताई पवार, युवा नेते युगेंद्र पवार, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते. के. बी. उद्योग समुहाचे संचालक सचिन यादव यांनी खा. शरद पवार यांच्यासह उपस्थितांना प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली.

सदर सदीच्छा भेटीनंतर, ‘‘पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेती क्षेत्रात के.बी. एक्सपोर्ट करत असलेलं कार्य प्रेरणादायी आहे. शेतीचं, शेतकर्‍यांचं सशक्तीकरण व कृषिप्रधान भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा नवोन्मेषी उपक्रमांची नितांत गरज आहे’’, असे मत खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.

Spread the love