। लोकजागर । फलटण । दि. 3 जून 2025 ।
येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालय व वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांना 42 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविताकाकी सूर्यवंशी – बेडके होत्या. संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके, उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, नियामक मंडळ सदस्य महेंद्र सूर्यवंशी – बेडके, सी. एल. पवार, विश्वासराव सूर्यवंशी – बेडके, श्री. तारळकर, श्री निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सौ. वेणूताई चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविका सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलच्या पर्यवेक्षिका गायकवाड यांनी केले. बापूसाहेब मोदी यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रा. सौ. घनवट यांनी मानले.
कार्यक्रमास सर्व शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.