‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ चित्रपट आवश्य पहावा : राजेंद्र बरकडे यांचे आवाहन

। लोकजागर । फलटण । दि. 6 जून 2025 ।

पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अफाट आहे. हे कार्य ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ या चित्रपटात मांडत असताना निर्माते सोमनाथ शिंदे आणि दिग्दर्शक सुशांत सोनवणे यांनी कसोशीने प्रयत्न केलेला आहे. हा चित्रपट सर्व समाजबांधवांनी आवश्य पहावा, असे आवाहन मराठी चित्रपट दिग्दर्शक राजेंद्र बरकडे यांनी केले.

राजेंद्र बरकडे यांनी सुजन फौंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव, रोहन धायगुडे, निलेश धुरगुडे, नितीन सुळ यांच्यासह लोणंद येथे धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर हा चित्रपट पाहिला. त्यावेळी ते बोलत होते.

‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ या चित्रपटामुळे अहिल्यादेवींनी केलेल्या संपूर्ण लढाया, यातील पराक्रम व त्यांनी केलेल्या विविध योजना, सती प्रथा बंद करणे, विधवा महिलांना वारसा हक्क चालू करणे, हुंडाबंदी यापेक्षाही अनेक पैलू यामध्ये उलगडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी पहावा, असेही आवाहन करण्यात आले.

Spread the love