। लोकजागर । फलटण । दि. 16 जून 2025 ।
लोणंद येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. नितीन सावंत यांच्या पुढाकारातून, तसेच लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या अध्यक्षतेखाली, बळीराजा फाउंडेशन बाळू पाटलाची वाडी व खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आरडगाव ता. फलटण येथील भजनी मंडळाने उत्तम सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला आणि आपल्या गायनकौशल्याने सर्वांची मने जिंकली. मंडळाच्या या यशामुळे गावाचा गौरव मोठ्या अभिमानाने उंचावला आहे.

लोणंद येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. नितीन सावंत यांच्या पुढाकारातून, तसेच लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या अध्यक्षतेखाली, बळीराजा फाउंडेशन बाळू पाटलाची वाडी व खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सन – २०२५ या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान या यशाबद्दल भजनी मंडळातील सर्व सदस्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

