महावितरणकडून माहिती
। लोकजागर । फलटण । दि. 24 जून 2025 ।
आज मंगळवार, दिनां 24 जून 2025 रोजी दिवसभर फलटण शहरातील वीज पुरवठा खंडीत होणार आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

याविषयी महावितरण ग्राहक यांना उद्देशून महावितरणकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेत सांगण्यात आले आहे की, दिनांक:24.06.2025 (वार-मंगळवार) रोजी पालखी सोहळा यासाठी अत्यावश्यक लाइन मेंटेनन्सच्या, HT/LT लाइनच्या खालील झाडांच्या फांद्या तसेच रोहित्र मध्ये ऑईल भरणे, U/G केबल, ईत्यादी सर्व कामाकरिता 22KV फलटण शहर सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00, 22KV YC फिडर सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.30 , 22KV Municipal फिडर दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत फिडर वरील लाईट सप्लाय बंद राहील. काम लवकर झाले तर अगोदर सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. कृपया याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

