। लोकजागर । फलटण । दि. 26 जून 2025 ।
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दिनांक 28 जून 2025 रोजी फलटण शहरात आगमन होणार आहे. या पवित्र सोहळ्यात लाखो वारकरी आणि भाविकभक्त सहभागी होतात. त्यांच्या सेवेसाठी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी समर्थ प्रतिष्ठान फलटण, संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी फलटण व रमण भोईटे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी वारकर्यांसाठी विविध मोफत सेवा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी 2 नंतर सुरु होणार्या या सेवा कार्याच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, ओरियन पतसंस्थेचे चेअरमन हणमंत सरक महाराज (मिरगांव), बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमावेळी शिवदत्त आय फेको सेंटर तर्फे मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन, डायनो क्लिनीक लॅब तर्फे शुगर चेक कॅम्प, पोस्ट हेल्थ इन्शुरन्स कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर यावेळी चहा वाटप, जेवण सुविधा, बिस्किट आणि केळी वाटपही करण्यात येणार आहे.
डॉ. अनिल माने, डॉ. संतोष बोडके, धिरज मोरे, किशोर काकडे, बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळ, बुरूड गल्ली, फलटण, नव चैतन्य गणेशोत्सव मंडळ, बारामती रोड, अलगुडेवाडी, निर्भीड 24 तास न्यूज नेटवर्क, क्रांतीसुर्य जनरल कामगार संघटना फलटण यांचे सौजन्याने हे सर्व उपक्रम पार पडणार असल्याचेही समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले.
