सदगुरु सेवा प्रतिष्ठानकडून फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पास अर्थसहाय्य

। लोकजागर । फलटण । दि. 30 जून 2025 ।

येथील सदगुरु सेवा प्रतिष्ठान यांच्यावतीने फिरती विज्ञान प्रयोगशाळा या प्रकल्पाला रुपये 35 हजारचे अर्थसहाय्य देण्यात आले. सदरचे अर्थसहाय्य प्रयोगशाळा साहित्य घेण्यासाठी देण्यात आले आहे.

फलटण शहरातील दादा महाराज मठ, ब्राह्मण गल्ली येथे सदगुरु सेवा प्रतिष्ठानचे विश्वस्त सदस्य वामनराव घळसासी यांच्या हस्ते या अर्थसहाय्याचा धनादेश सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प प्रमुख पोपटराव उर्फ राहुल बर्गे व प्रकल्प शिक्षक योगेश ढेकळे यांच्याकडे देण्यात आला.

यावेळी संस्थेचे खजिनदार सर्जेराव लोहार, विश्वस्त संजय चिटणीस उपस्थित होते.

Spread the love