। लोकजागर । फलटण । दि. 01 जुलै 2025 ।
मार्च 2025 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये येथील श्री सदगुरु शिक्षण संस्था संचलित सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या प्रशालेची विद्यार्थीनी कु.संस्कृती दत्तू सरक हिला गणित विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले होते. या यशाबद्दल तिचा व तिला मार्गदर्शन करणार्या सौ. प्रियंका अबदागिरे यांचा सत्कार सातारा जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे करण्यात आला. यावेळी प्राचार्य रविंद्र येवले व मान्यवर उपस्थित होते.

या उत्तुंग यशाबद्द्ल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, संस्थेच्या सेक्रेटरी ऍड. सौ.मधुबाला भोसले, संस्थेचे अध्यक्ष तुषार गांधी, प्रशासकीय अधिकारी सौ.स्वाती फुले, प्रशालेचे मुख्याध्यापक नागेश पाठक, आनंदवन प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण व शिक्षक वर्ग इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.

