ताथवडा परिसरात देशी झाडांचे वृक्षारोपण

नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा उपक्रम

। लोकजागर । फलटण । दि. 07 जुलै 2025 ।

सातारा येथील वनक्षेत्र परिसरात नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी,फलटण या संस्थेच्या विद्यमाने ताथवडा वनक्षेत्रात डोंगर परिसराला पूरक अशा देशी झाडांचे वृक्षारोपण अतिशय उत्साहात पार पडले. या उपक्रमासाठी वनविभाग फलटण, फलटण, रनर्स ग्रुप,फलटण, डॉक्टर्स असोसिएशन, PDA क्रिकेट कमिटी व संत गाडगे बाबा आश्रम शाळा ताथवडे यांचे सहकार्य लाभले.

सदर वृक्षारोपणामध्ये खैर, बोर, करवंद, बेहडा, भुत्या आणि पांगारा अशा सर्व झाडांचा समावेश होता.

“‘वृक्ष असतील तरच आपणही असु’ हे विसरता कामा नये म्हणुन आपण मागील काही वर्षांपासुन हाती घेतलेले देशी वृक्ष तयार करुन ते पुन्हा रोपण करण्याचे काम सातत्याने असेच एकमेकांच्या मदतीने पुढे घेऊन जाऊयात आणि जास्तीत जास्त देशी झाडांचे रोपण आणि त्यांचे संवर्धन करुन निसर्ग आणि अन्नसाखळी वाचवण्यास हातभार लावुयात”, असे आवाहन यावेळी नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांच्यावतीने करण्यात आले.

Spread the love