। लोकजागर । फलटण । दि. 07 जुलै 2025 ।
हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने रांची येथे दी. ७ ते १५ जुलै या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या पाच महिला खेळाडू निकिता वेताळ, श्रेया चव्हाण, अनुष्का केंजळे व वेदिका वाघमोरे यांची निवड झाली आहे.

या सर्व खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा महाराष्ट्राच्या संघाचे ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री महेश खुटाळे व एन आय एस हॉकी प्रशिक्षक श्री सचिन धुमाळ तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून श्री बी बी खुरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघात निवड झालेल्या महिला खेळाडूंचे व त्याना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समिती चेअरमन शिवाजीराव घोरपडे, सदस्य महादेवराव माने, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, सहायक तपासणी अधिकारी सुधीर अहिवळे, प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्या सौ. शुभांगी बाबर, माध्यमिक पर्यवेक्षक रावसाहेब निंबाळकर, माध्यमिक पर्यवेक्षक राजेंद्र नाळे, पर्यवक्षिका सौ. पूजा पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य तथा सर्व क्रीडा शिक्षक व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.