परतीच्या प्रवासात माऊलींचा पालखी सोहळा रविवारी फलटण मुक्कामी

यंदाचा मुक्काम चतुर्थीच्या एक दिवस आधी

। लोकजागर । फलटण । दि. 09 जुलै 2025 ।

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा पंढरपूरहून आळंदीकडे परतीचा प्रवास उद्या गुरुवार, दिनांक 10 जुलै रोजी सुरु होणार असून यंदाच्या वर्षी हा सोहळा रविवार, दिनांक 13 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजता फलटण मुक्कामी येणार आहे.

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्यावर्षीही माऊलींचा परतीच्या प्रवासातील फलटण शहर मुक्काम रविवार पेठेतील उघडा मारुती मंदिरासमोर असलेल्या श्री संत नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिरात होणार असून भाविक – भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संत नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिवर्षी माऊलींचा फलटण शहरातील परतीचा मुक्काम चतुर्थीच्या दिवशी येत असतो. मात्र आगामी चतुर्थी सोमवार, दिनांक 14 जुलै रोजी असून यंदा पालखी सोहळा चतुर्थीच्या एक दिवस आधी फलटण मुक्कामी येत आहे.

Spread the love