| लोकजागर | फलटण | दि. २८ जुलै २०२५ |
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवसाचा विशेष उपक्रम महा एनजीओ फेडरेशन तर्फे राज्यातील 55 संस्था सोबत गोशाळामध्ये “गो- सेवा – हरितसेवा ” या उद्दिष्टानुसार वृक्षारोपण अभियान आयोजित करण्यात आले होते. त्याअंतर्गत नवयान संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण संस्था बरड ता. फलटण मार्फत कै. श्री. जयवंत वृंदावन गोपालन व गो संवर्धन गोशाळा, राजाळे येथे पिंपळ, वड, चिंच, करंज आणि कडुलिंब अशी पाच प्रकारची विविध झाडे लावण्यात आली.

यावेळी फलटण कोरेगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन पाटील, संस्थेचे अध्यक्ष हनुमंत लोंढे, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

