गिरवी गोपाळकृष्ण मंदिराचे उत्तराधिकारी जयंत काका देशपांडे यांचा पू. गोविंद देव गिरी स्वामीजींकडून सत्कार

| लोकजागर | फलटण | दि. १५ ऑगस्ट २०२५ |

अलिकडेच ७५व्या वर्षात पदार्पण केलेले गिरवी येथील गोपाळकृष्ण मंदिराचे विद्यमान उत्तराधिकारी श्री जयंत काका देशपांडे यांचा पूज्य राष्ट्रसंत गोविंद देव गिरी स्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी स्वामीजींनी शाल, श्रीफळ आणि यथोचित दक्षिणा देऊन श्री जयंत काकांच्या अध्यात्मिक कार्याचा गौरव केला व आशीर्वाद दिले.

गिरवीतील गोपाळकृष्ण मंदिर हे पू. स्वामीजींसह अनेक ज्येष्ठ संतपुरुषांचे श्रद्धास्थान असून, मंदिराचा दिव्य इतिहास आहे. अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार होऊन विविध वैदिक अनुष्ठान, लिखित नामजप, गीता वाचन, विष्णूसहस्रनाम पठण, हरीपाठ, भागवत सप्ताह यांसारखे धार्मिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. भक्तिमार्गाचा प्रचार-प्रसार या माध्यमातून होत असून, श्री जयंत काका देशपांडे यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ देश-विदेशातील साधकांना मिळत आहे.

Spread the love