मुधोजी महाविद्यालय क्रीडांगणावर होणार तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा

फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजन

l लोकजागर l फलटण l दि .२० ऑगस्ट २०२५ l

फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने मुधोजी महाविद्यालय क्रीडांगण, फलटण येथे रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत १२, १४, १६, १८ आणि २० वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होण्याची संधी आहे. तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनने जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

स्पर्धेचा शुभारंभ सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते मुधोजी महाविद्यालय क्रीडांगणावर होईल.

वयोगटानुसार क्रीडा प्रकार:

  • २० वर्षाखालील: 100 मीटर, 400 मीटर, 1600 मीटर, लांब उडी, गोळा फेक
  • १८ वर्षाखालील: 100 मीटर, 400 मीटर, 1000 मीटर, लांब उडी, गोळा फेक
  • १६ वर्षाखालील: 100 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, लांब उडी, गोळा फेक
  • १४ वर्षाखालील: 100 मीटर, 400 मीटर, 600 मीटर, लांब उडी, गोळा फेक
  • १२ वर्षाखालील: 100 मीटर, 300 मीटर, लांब उडी, गोळा फेक

नोंदणी व प्रवेश फी: स्पर्धकांनी नाव नोंदणीसह ३० रुपये प्रवेश फी जमा करून २० ते २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत जिमखाना विभाग, मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे आपले चेस नंबर घेऊन यावे. प्रत्येक खेळाडू २ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊ शकतो. प्रत्येक क्रीडा प्रकारात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळालेल्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क:

  • जनार्दन पवार – ९२८४७६५९९५
  • नामदेव मोरे – ९९६००८२१२०
  • ॲड. रोहित अहिवळे – ७४९९५३७९३७
  • राज जाधव – ९२२६१३९६५३
  • तायाप्पा शेंडगे – ९३२२७४८१९९
  • धीरज कचरे – ८३९०९९१९९९
  • सुहास कदम – ७०८३७२०५२०
  • सूरज ढेंबरे – ८८०५७७७९९८
Spread the love