| लोकजागर | फलटण | दि. २१ ऑगस्ट २०२५ |
“आदरणीय काकांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये राबविण्यात आलेल्या क्रीडा व विविध स्पर्धा कौतुकास्पद आहेत”, असे प्रतिपादन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके यांनी केले.

गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांचा द्वितीय स्मृतिदिन श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण व सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज फलटण यांचे संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. त्यावेळी डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके बोलत होते.
प्रारंभी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, उपाध्यक्ष सी. एल. पवार, संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), सदस्या सौ. ज्योतीताई सूर्यवंशी (बेडके), माजी प्राचार्य आप्पा शिंदे यांच्या हस्ते कै. सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात, गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला सज्ज ठेवले पाहिजे हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कै. सुभाषराव सूर्यवंशी यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगत असताना संस्थेच्या वाटचालीविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
बापूसाहेब मोदी यांनी आपल्या मनोगतातून कै. सुभाषकाकांच्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला व व संस्थेच्या शैक्षणिक प्रगती विषयी समाधान व्यक्त केले.
दिनांक १८ ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत कै. सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या सर्व शाखांमध्ये राबविण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला, काव्यवाचन व गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशस्तीपत्र, गुलाब पुष्प व शैक्षणिक साहित्य भेट देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. श्रीणी तगारे, प्रणिती गाडे, प्रेरणा भोईटे, समीक्षा भिवरकर या स्पर्धकांनी काव्य गायन व वक्तृत्व उपस्थित मान्यवरांसमोर सादर केले.
विद्यार्थी मनोगतामध्ये प्रशालेची इयत्ता ९ वीतील कु.श्रावणी माधव नाळे या विद्यार्थिनीने कै. सुभाषकाकांविषयी इंग्रजी मधून मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्रशालेच्या प्राचार्या सौ.एन.एम. गायकवाड, उपप्राचार्य पी.डी. घनवट, पर्यवेक्षिका सौ. सी. आर. रणवरे यांनी केले. कला शिक्षिका सौ. डी.पी. ढेंबरे यांनी कार्यक्रमाचे उत्तम फलक लेखन केले.
या कार्यक्रमाकरिता संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
या स्मृतिदिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.डी. यादव, सौ. एस. एम. तगारे यांनी केले तर आभार प्रा.एस. एन. राऊत यांनी मानले.
