‘मी मराठा बोलतोय’ कविता : मराठा समाजाचा आवाज

| लोकजागर | फलटण |दि २ सप्टेंबर २०२५|

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान युवा कवी अविनाश चव्हाण यांची ‘मी मराठा बोलतोय’ ही कविता प्रचंड गाजत आहे. ही कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असून मराठा समाजाचा बुलंद आवाज बनली आहे. कवितेतून समाजाच्या वेदना, संघर्ष आणि न्याय्य मागण्या प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. “आरक्षण ही भीक नाही, तो माझा अधिकार आहे” अशा परखड शब्दांत समानतेचा हक्क अधोरेखित करण्यात आला आहे.

या कवितेची भाषा सोपी, परंतु धारदार असल्याने ती सर्वसामान्यांना सहज भिडते. मराठा आंदोलक व नेते आपल्या भाषणांमध्ये या कवितेतील ओळींचा वापर करत आहेत. आंदोलनात घोषणाबाजीसोबत या कवितेने प्रेरणादायी माध्यमाचे स्वरूप घेतले आहे.

व्हिडिओ, ऑडिओ आणि लिखित स्वरूपात ही कविता मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असून समाजाच्या भावना राज्याच्या सीमा ओलांडून देशभर पोहोचवत आहे. कला आणि आंदोलनाची सांगड घालत या कवितेने लढ्याला नवी धार दिली आहे. त्यामुळे ‘मी मराठा बोलतोय’ ही कविता आज मराठा समाजाचा स्वाभिमान, आत्मविश्वास आणि न्यायलढ्याचा जाहीरनामा ठरत आहे.

Spread the love