| लोकजागर | आरडगाव | दि. ११ सप्टेंबर २०२५ |
रयत शिक्षण संस्थेच्या श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

सद्गुरु गाडगे महाराज आश्रम शाळा, खराडेवाडी (ता. फलटण) येथे ४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील तब्बल ७६ संघांनी सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेतील कामगिरी:
- १७ वर्षे मुलांचा टेनिक्वाईट संघ – प्रथम क्रमांक (थेट विभागीय स्पर्धेसाठी निवड)
- १७ वर्षे मुलींचा संघ – तृतीय क्रमांक
- १९ वर्षे मुले व मुलींचे संघ – द्वितीय क्रमांक
- १४ वर्षे मुलींचा संघ – तृतीय क्रमांक
विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी –
श्रेयश शिंदे (इयत्ता १०वी), कुणाल चव्हाण (इयत्ता ९वी), श्रवण भोईटे (इयत्ता १०वी), चिन्मय चव्हाण (इयत्ता १०वी), सार्थक भोईटे (इयत्ता १०वी).
अभिनंदन सोहळा –
शाळा समिती अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, सदस्या सुप्रियाताई आहीरेकर, मुख्याध्यापक विठ्ठल निकाळजे, ग्रामस्थ तसेच आजी-माजी सरपंच-उपसरपंच यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
मार्गदर्शनाचे शिल्पकार –
या यशामागे शाळेचे उपशिक्षक राजेंद्र राजपुरे यांचे अथक परिश्रम आणि प्रभावी मार्गदर्शन असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय पातळीवर चमक दाखवत विभागीय स्तरावर धडक दिली आहे.
