| लोकजागर | फलटण | दि. ११ सप्टेंबर २०२५ |
श्री सदगुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्था, फलटण व लायन्स क्लब, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शनी दत्तक योजना अंतर्गत मुलींना गणवेश वाटप व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी योजनाध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले , लायन्स क्लबचे डॉ. सौरभ ताटे, डॉ. पाटणकर, निरंजन उजगरे, पांडुरंग पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मुलींना गणवेश वितरित करण्यात आले तसेच मुलांची नेत्र तपासणीही पार पडली.

