| लोकजागर | फलटण | दि. २१ सप्टेंबर २०२५ |
राजा शिवछत्रपती युवक संघ, फलटण यांच्या वतीने कै. सुभाषराव शिंदे भाऊ यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम दिनांक १९ सप्टेंबर २०२५, शुक्रवार, भाऊंची कर्मभूमी असणाऱ्या शिंदेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेत पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन पत्रकार श्री. अजय माळवे, अॅड. श्री. रोहित अहिवळे, श्री. सुधीर अहिवळे, श्री. यशवंत खलाटे पाटील, श्री. दादासाहेब यादव, श्री. राजेंद्र शिंदे व श्री. ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत विजेत्यांना बक्षिसे शिंदेवाडी गावचे सरपंच श्री. आनंद यादव यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
या प्रसंगी बाळूभाऊ शिंदे, अरुण शिंदे, संतोष शिंदे उपस्थित होते. तर पाहुण्यांचे स्वागत संदीप शिंदे, संदीप यादव व राहुल शिंदे यांनी केले.

स्पर्धेचे गट व विजेते
एकूण १२५ स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली. प्रत्येक गटातून पाच विजेत्यांची निवड करण्यात आली.
गट १ :
- कुमार श्रेयस योगेश यादव
- कुमारी स्वरा चंद्रकांत खलाटे
- कुमार अभिराज सतीश यादव
- कुमारी संस्कृती राजेंद्र खराडे
- कुमारी जानवी दत्ता माने
गट २ :
- कुमारी अनुश्री पांडूरंग यादव
- कुमार विनय मिलिंद कदम
- कुमारी तन्वी प्रकाश मोहीते
- कुमारी प्रिया रणजित बगे
- कुमारी स्वराजली प्रमोद जाधव
गट ३ (इयत्ता ५वी ते ७वी) :
- कुमारी स्वरा सतीश यादव
- कुमारी आकांक्षा सचिन जाधव
- कुमार राजवर्धन सचिन भगत
- कुमार शिवतेज सतीश भोसले
- कुमारी श्रावणी संजय खराडे
परीक्षक व मान्यवरांची उपस्थिती
या स्पर्धेचे परिक्षण शरद प्रतिभा हायस्कूल, शिंदेवाडी येथील आत्तार सर व गायकवाड मॅडम यांनी केले. यावेळी खोमणे सर, राजेंद्र यादव यांच्यासह गावातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाळे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन युवक संघाचे सचिन भगत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.खलाटे मॅडम, निकाळजे गुरूजी, रणवरे गुरूजी, जगताप गुरूजी, सौ. सोनवलकर मॅडम यांनी सहकार्य केले.
