| लोकजागर | फलटण | दि. 24 सप्टेंबर 2025 |
कोळकी येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश दिनकर शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचा अर्थात खासदार गटाचा त्याग करून पुन्हा राजे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सातारा जिल्हा परिषदेतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आगामी राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांचा राजे गटात प्रवेश करण्यात आला. या कार्यक्रमात राजकीय व सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते उपस्थित होते. विशेषतः श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, दत्तोपंत शिंदे, कोळकी विकास सोसायटीचे चेअरमन रवींद्र नाळे, उपसरपंच डॉ. अशोक नाळे, अनिल कोरडे, विक्रम पखाले, नवनाथ दंडिले आणि दत्तात्रय नाळे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, या प्रवेशामुळे राजकीय पटलावर नवीन समीकरणांसाठी सर्वांचे लक्ष कोळकीकडे लागले आहे.
