जिंतीच्या श्री जितोबा विद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती उत्साहात साजरी

। लोकजागर । फलटण । दि. 27 सप्टेंबर 2025 ।

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती श्री जितोबा विद्यालय, जिंती (ता. फलटण, जि. सातारा) येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

दिनांक 22 सप्टेंबर रोजी त्यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक ट्रॅक्टर ट्रॉलीतून जिंती गावातून आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे झांज पथक व लेझीम पथक प्रमुख आकर्षण ठरले. सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवणाचा आस्वादही देण्यात आला.

दिनांक 24 सप्टेंबर रोजी मुख्य सभेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश दाभाडे (सहाय्यक विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था मध्य विभाग सातारा), ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ (सल्लागार समिती सदस्य), तसेच पीएसआय दीपक पवार (साखरवाडी) उपस्थित होते. स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र दौलतराव रणवरे अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर आण्णा व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. दिनेश दाभाडे, रवींद्र बेडकीहाळ व पीएसआय दीपक पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील प्रसंग सांगून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे यांनी केले, आभार मुख्याध्यापिका सौ. जाधव एम.डी. यांनी मानले, तर सूत्रसंचालन अंकुश सोळंकी व अर्चना सोनवलकर यांनी केले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love