नवरात्र उत्सवानिमित्त माऊली फाउंडेशनतर्फे सामूहिक कुमारिका पूजन

। लोकजागर । फलटण । दि. 27 सप्टेंबर 2025 ।

माऊली फाउंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त दिनांक 1 ऑक्टोबर रोजी जुने गावठाण भागात सामूहिक कुमारिका पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पूजन विधीत गावातील कुमारीकांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती माऊली फाऊंडेशनचे संस्थापक अनुप शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.

लोप पावत चाललेल्या संस्कृतीचे जतन करणे आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे, अनुप शहा यांनी आवर्जून सांगितले.

Spread the love