। लोकजागर । फलटण । दि. 11 ऑक्टोबर 2025 ।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, फलटण यांच्या वतीने संघ शताब्दी वर्षानिमित्त फलटण शहर पथ संचलन व विजयादशमी उत्सव 2025 मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आज शनिवार, दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 4.15 ते 6.30 या वेळेत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सातारा जिल्हा कार्यवाह आशुतोष आठ्ठले तर प्रमुख पाहुणे म्हणून के. बी. एक्सपोर्टचे व्यवस्थापकीय संचालक सचिन यादव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फलटण शहर उपखंड प्रमुख विक्रम निकम व फलटण तालुका कार्यवाह अॅड. प्रशांत निंबाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या पथ संचलनाची सुरुवात प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल, मलठण येथून होऊन श्री स्वामी समर्थ मंदीर, श्री हरिबुवा महाराज मंदीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक (पाचबत्ती), श्रीराम मंदीर, गजानन चौक, नवलबाई कार्यालय, मारवाड पेठ, श्री दत्त नगर आणि शेवटी सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल येथे समारोप होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल येथे शस्त्रपूजन उत्सव संपन्न होणार आहे.

कार्यक्रमात स्वागत, दीपप्रज्वलन, प्रार्थना, संघगीत, प्रमुख पाहुण्यांचे मनोगत, वक्तृत्व आणि संचलनाचे प्रात्यक्षिक यांचा समावेश आहे.
संघ शाखांमधील स्वयंसेवकांनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
