आझाद हिंद प्रतीसरकार सेनेचा माण तालुक्यात विस्तार

। लोकजागर । दहिवडी । मनिषा काळे । दि. 11 ऑक्टोबर 2025 ।

आझाद हिंद प्रतीसरकार सेनेचा विस्तार माण तालुक्यात करण्यासाठी दहिवडी येथे बायो हेल्थ सेंटरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात आध्यात्मिक ब्रह्मचारी वयोवृद्ध महाराज यांचा सत्कार संस्थापक संतोष साठे उर्फ संतोषसिंह कर्मवीरराजे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आझाद हिंद प्रतीसरकार सेना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतात आयुर्वेद औषधांचे महत्त्व आणि आरोग्य संवर्धनातील त्यांचा उपयोग यावर मार्गदर्शन केले. दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या या मेळाव्यात संघटनेचे ध्येय, धोरणे आणि उद्दिष्टे यांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच बायो हेल्थ उपचार पद्धतीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित महिला व पुरुषांची सेनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. दहिवडी व परिसरातील नागरिकांना दररोज मोफत बायो हेल्थ उपचार घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रसंगी आझाद हिंद प्रतीसरकार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक संतोष साठे उर्फ संतोषसिंह कर्मवीरराजे यांचा स्थानिक नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Spread the love