| लोकजागर | फलटण | दि. ११ नोव्हेंबर २०२५ |
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासूनच शहरात आणि प्रभाग क्र. ८ मध्ये राजकीय हालचालींना जोर आला आहे. या प्रभागातून राजे गटाकडून निलेश अशोक गायकवाड यांचं नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढं येत असून, सर्वसामान्य लोकांपासून तर युवकांपर्यंत त्यांच्या नावाची चर्चाच सुरू आहे.
कष्टाळू, प्रामाणिक आणि साध्या स्वभावाचे असलेले निलेश गायकवाड हे गेल्या काही वर्षांपासून समाजकारणात सातत्याने सक्रिय आहेत. प्रभागातील लोकांच्या सुख-दुःखात ते नेहमी हजर राहतात, त्यामुळे “आपला माणूस” म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे. राजे घराण्याशी निष्ठा आणि कामाचा प्रामाणिकपणा यामुळे कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे.
प्रभाग क्रमांक ८ हा ओबीसी पुरुष आरक्षित असून, या मतदारसंघात तरुण मतदारांची संख्या लक्षणीय आहे. निलेश गायकवाड हे तरुण पिढीचं प्रेरणास्थान मानले जात असून, त्यांच्या भोवती एकजूट होणाऱ्या तरुणांची मोठी फौज दिसते. “राजकारण नाही तर समाजकारण” या ध्येयाने काम करणारा आणि सर्वांना मिळून नेणारा चेहरा म्हणून त्यांचं नाव आघाडीवर आहे.
स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारीसाठी सर्वसामान्य लोकांकडून, महिला वर्गाकडून आणि व्यापार क्षेत्रातूनही चांगला पाठिंबा मिळत आहे. “आपल्याच माणसाला संधी मिळाली पाहिजे” असं अनेक नागरिकांचं मत आहे. त्यामुळे राजे गटाकडून गायकवाड यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा व्हावी, अशी मागणी जनतेकडून आणि कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.
दरम्यान, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी जवळीक असलेले आणि त्यांच्या विचारांवर चालणारे गायकवाड हे “राजेगटाचं खात्रीशीर तिकीट” म्हणून लोकांमध्ये ओळखले जात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मध्ये निलेश गायकवाड यांचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलं असून, “आपला माणूस, आपल्या प्रभागात” असं चित्र जनतेमध्ये दिसू लागलं आहे.
