नगराध्यक्ष निवडणूक भाजपच्या चिन्हावरच, २७-० विजय मिळवणार : रणजितसिंह नाईक निंबाळकर

| लोकजागर | फलटण | दि.१३ नोव्हेंबर २०२५ |

फलटण नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर लढवली जाणार असून या निवडणुकीत २७ – ० असा विजय मिळवण्याचा निर्धार, माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजतसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

सोमवार पेठ येथे माजी नगरसेवक सोमशेठ जाधव व विक्रमभैय्या जाधव यांचा आमदार सचिन पाटील व श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश झाला. त्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, भाजपा, राष्ट्रवादीचे आजी – माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

फलटण शहर बदलायला आपण निघालो आहे. यामध्ये सर्वांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. निवडणूक २७ – ० करण्याचा एकमुखी निर्णय आपण सर्वांनी केला असून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करण्याचा शब्द आपल्याला इथून मिळाला आहे, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

Spread the love