| लोकजागर | फलटण | दि. १६ नोव्हेंबर २०२५ |
फलटण नगरपालिका निवडणुकीला वेग येत असताना काँग्रेस पक्षाने आज नगराध्यक्ष पदासाठी सचिन सूर्यवंशी (बेडके) यांचा अर्ज दाखल केला. त्यांनी प्रभाग क्र. 13 साठीचा अर्जही प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या कडे सादर केला.
अर्ज दाखल करताना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या वेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शहराध्यक्ष पंकज पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विकासाच्या मुद्द्यांवर भक्कम भूमिका मांडण्याचा काँग्रेसचा संकल्प असून, सामाजिक कामांमुळे आपल्या प्रभागात चांगली पकड निर्माण केलेल्या सचिन सूर्यवंशी यांची उमेदवारी पक्षासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
