ज्येष्ठ नेते डॉ. विजयराव बोरावके यांचे निधन

| लोकजागर | फलटण | दि. 17 नोव्हेंबर 2025 |

कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबईचे माजी चेअरमन डॉ. विजयराव कोंडीराम बोरावके (आण्णा) वय ८४ यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. सामाजिक, सहकारी व कृषी क्षेत्रात दीर्घकाळ विविध माध्यमातून योगदान देत असताना त्यांनी आपला ठसा उमटवला होता.

फलटण व परिसरात त्यांना एक अभ्यासू, तडफदार आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love